योजना कशी आहे?
ही योजना भारत सरकारने “बेटी बचाओ – बेटी पढाओ” उपक्रमांतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली.ही योजना 10 वर्षांखालील मुलींसाठी आहे.एका मुलीसाठी फक्त एक खाता उघडता येतो आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन खाती (तीन, जर जुळ्या किंवा तिळकशा मुली असतील तर) उघडता येतात.पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँकांमध्ये खाती उघडता येतात.
ठेवी संदर्भातील माहिती
किमान ठेवीची रक्कम – ₹250 प्रति वर्ष
कमाल ठेवीची रक्कम – 1.5 लाख प्रति आर्थिक वर्ष
ठेवीचे प्रकार – रोख रक्कम, धनादेश, डिमांड ड्राफ्ट
खाते उघडताना पासबुक दिले जाते.
व्याज दर (एप्रिल – जून 2025)
8.2% वार्षिक, एकत्रित व्याजदर हा व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी पुनर्रचना करते.व्याजावर कर सवलत आहे आणि ठेवींवर 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
कालावधी व पैसे काढण्याचे नियम
खाते मुदत: खाते उघडल्यापासून 21 वर्षे किंवा मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर. लग्न झाल्यास त्या वेळीच खाते बंद करता येते. ठेवी कालावधी : खाते उघडल्यापासून 15 वर्षे पर्यंतच ठेवी करता येतात.त्यानंतर खाते चालू राहते आणि व्याज मिळत राहते.18 वर्षे वयानंतर शिक्षण किंवा लग्नासाठी मूळ रकमेतून 50% रक्कम काढता येते.
खाते उघडताना आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजना फॉर्म (पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध)मुलीचा जन्म दाखला, पालक व मुलीचे छायाचित्र, पालकाचा ओळख पुरावा (आधार, पॅन, मतदार ओळखपत्र इ.)नाते दर्शवणारा पुरावा, पालकाचा पत्ता पुरावा (बिल, भाडे करारपत्र इ.)
अर्ज कसा करावा? (पोस्ट ऑफिसमध्ये प्रक्रिया)
जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. SSY फॉर्म घ्या आणि भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा. किमान ₹250 ठेवीसह खाते उघडा. पासबुक मिळवा.
फायदे
उच्च व्याजदर: 8.2% वार्षिक (करमुक्त), कर बचत: 80C अंतर्गत ₹1.5 लाखपर्यंत सवलत, कमी गुंतवणुकीत सुरुवात: फक्त ₹250 वार्षिक, मुलीच्या शिक्षण व विवाहासाठी निधी तयार, सरकारी हमी योजना: पूर्णपणे सुरक्षित, सर्वत्र उपलब्धता: सर्व पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.