राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC): गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची विश्वासार्ह योजना

मुंबई, २० जून २०२५ – पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) ही सध्या गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. सरकारने एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीसाठी NSC साठी ७.७% वार्षिक व्याजदर कायम ठेवला असून, ही व्याजदर मुदतपूर्तीपर्यंत वार्षिक संयोजित पद्धतीने वाढत जाते.

५ वर्षांची लॉक-इन अट – या योजनेत गुंतवलेली रक्कम ५ वर्षांसाठी लॉक-इन राहते. मात्र, खातेदाराचा मृत्यू, न्यायालयीन आदेश किंवा जबाबदार खातेदाराकडून प्रमाणपत्र जप्त केल्यास पूर्वमुदत बंद करण्याची मुभा मिळते

गुंतवणूक मर्यादा – किमान गुंतवणूक: ₹१००० (₹१०० च्या पटीत पुढील गुंतवणूक)कमाल मर्यादा नाही: एक किंवा अधिक खाती उघडता येतात.

कोण उघडू शकतो खाते? – प्रौढ व्यक्ती एकट्याने किंवा संयुक्त नावाने (३ व्यक्तींपर्यंत)पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने १० वर्षांवरील मुले स्वतःच्याच नावाने.

खाते उघडण्याची प्रक्रिया – ऑफलाइन (पोस्ट ऑफिस):अर्ज NSC-1 भरून सादर करावा आधार, पॅन व पत्त्याचा पुरावारोख/चेक/डीडीद्वारे पैसे भरावेत. नॉमिनी तपशील द्यावा ऑनलाइन (IPPB अ‍ॅपद्वारे) : IPPB किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट लिंक असल्यास उपलब्ध.

करसवलती आणि करपध्दती – कलम ८०सी अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत करसवलत. पहिले ४ वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जात असल्यामुळे ८०सी अंतर्गत वजावट ५ व्या वर्षाचे व्याज करपात्र, मात्र TDS नाही.

सुरक्षिततेस प्राधान्य देणाऱ्यांसाठी उत्तम – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही पूर्णतः सरकारच्या हमीवर आधारित असल्यामुळे ती अत्यंत सुरक्षित मानली जाते. अल्प-मुदतीसाठी स्थिर उत्पन्न, करसवलत, आणि जोखीममुक्त गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी ही योजना एक आदर्श पर्याय ठरते.तथापि, थोड्या अधिक परताव्याच्या शोधात असणाऱ्यांनी SCSS, PPF, किंवा RBI फ्लोटिंग बॉण्ड यासारख्या पर्यायांचा विचार करावा.

Leave a Comment