ईराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष अनेक दशकांपासून चालू असून तो आता उघड युद्धाच्या दिशेने झुकत असल्याचे संकेत आहेत. या संघर्षाची मुळे राजकीय, धार्मिक, अणुशक्तीच्या महत्त्वाकांक्षा आणि प्रदेशातील वर्चस्व या मुद्द्यांशी जोडलेली आहेत.
१९४८–१९७९ : मैत्रीपूर्ण संबंधइस्त्राईलच्या स्थापनेनंतर ईराणने १९५० मध्ये इस्त्राईलला मान्यता दिली. त्या काळात दोन्ही देशांमध्ये तेल व्यापार, संरक्षण आणि गुप्तचर यामध्ये घनिष्ठ संबंध होते. पण हा काळ फार काळ टिकला नाही. १९७९ : इस्लामिक क्रांतीनंतर संबंध तुटले : १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडून आली आणि अयातुल्ला खोमैनी सत्तेत आले. त्यांनी इस्त्राईलला “छोटा सैतान” असे संबोधून सर्व संबंध तोडले. तेव्हापासून ईराणची अधिकृत भूमिका इस्त्राईलविरोधी राहिली आहे. १९८०–१९९० : हिजबुल्ला आणि अप्रत्यक्ष संघर्षईराणने लेबनॉनमधील शिया संघटना हिजबुल्लाला समर्थन देण्यास सुरुवात केली, जी नियमितपणे इस्त्राईलवर हल्ले करत होती. दुसरीकडे, इस्त्राईलने इराकला अप्रत्यक्षपणे काही समर्थन दिले.
२०००–२०१० : अणुकार्यक्रमामुळे तणाव वाढलाईराणच्या अणुशक्तीविषयक प्रकल्पांमुळे इस्त्राईल सतत चिंतेत होता. इस्त्राईलने कथितपणे इराणच्या अणुशास्त्रज्ञांचे खून घडवून आणले, तसेच सायबर हल्लेही केले. २०११–२०१५ : सीरियामध्ये संघर्ष, अणुकरारावरील वाद : सीरियातील गृहयुद्धात ईराणने अध्यक्ष बशर अल-असदला मदत केली. इस्त्राईलने ईराणच्या घुसखोरीवर लक्ष ठेवून शंभरहून अधिक हवाई हल्ले केले. २०१५ मध्ये झालेला JCPOA अणुकरार इस्त्राईलने तीव्र विरोध केला. २०२०–२०२३ : सावलीतील युद्ध, समुद्रातील हल्ले : दोन्ही देशांनी एकमेकांच्या जहाजांवर हल्ले केले, तसेच इराणचा मुख्य अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादे यांची हत्या करण्यात आली. इस्त्राईलवर इराणचा हात असल्याचा संशय आहे.
२०२३–२०२४ : प्रत्यक्ष हल्ल्यांची मालिका : ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्त्राईलवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये इराणच्या मदतीचा आरोप करण्यात आला.एप्रिल २०२४ मध्ये इराणने थेट ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्त्राईलवर हल्ला केला – हा पहिलाच उघड हल्ला होता. प्रत्युत्तरादाखल, इस्त्राईलने इराणमधील सैन्य व रडार केंद्रांवर हवाईहल्ले केले
.सध्याची परिस्थिती (२०२५) : सध्या इराण आणि इस्त्राईल यांच्यातील तणाव अत्यंत तीव्र आहे. अणुकरार ठप्प आहेत, सैन्य कारवाया सुरू आहेत आणि दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. संपूर्ण मध्यपूर्व या संघर्षामुळे सतत अशांततेच्या छायेत आहे.