भारताने बुधवारी अहमदाबादच्या भूमीवर सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या नोंदवली. शुभमनच्या गिलच्या ११२ (१०२) धावांच्या, बळावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३५६/१० धावा केल्या. भारताची अहमदाबादमधील यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या ३२५/५ होती, जी १५ नोव्हेंबर २००२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आली होती.