मुंबई | २० जून २०२५ : पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund – PPF) ही सध्या अनेक नागरिकांसाठी दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीचा प्रमुख पर्याय ठरत आहे. सरकारी हमी आणि करसवलतीमुळे ही योजना विविध वयोगटांतील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
१५ वर्षांचा कालावधी, करसवलतीचा लाभ – PPF योजनेत गुंतवलेली रक्कम १५ वर्षांसाठी लॉक-इन असते. सध्याचा व्याजदर ७.१% प्रति वर्ष असून, तो वार्षिक संयोजित (compounded) स्वरूपात दिला जातो.कलम ८० सी अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत करसवलत, आणि व्याज पूर्णतः करमुक्त असते. त्यामुळे ही योजना EEE (Exempt-Exempt-Exempt) कर प्रणालीतील एकमेव पर्याय आहे.
कोण उघडू शकतो PPF खाते? – भारतातील कोणतीही निवासी व्यक्ती, पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावानेही खाते उघडू शकतात. NRIs आणि Hindu Undivided Family (HUF) यांना ही योजना उपलब्ध नाही.
खाते उघडण्याची प्रक्रिया – PPF खाते पोस्ट ऑफिस किंवा IPPB मोबाईल अॅपद्वारे उघडता येते. त्यासाठी अर्ज, आधार कार्ड, पॅन, फोटो आणि किमान ₹५०० गुंतवणूक आवश्यक असते. खाते उघडल्यानंतर पासबुक दिलं जातं.
पैसे कधी काढता येतात? -५ वर्षांनंतर कर्ज घेता येते
७ वर्षांनंतर अंशतः पैसे काढता येतात
१५ वर्षांनंतर संपूर्ण रक्कम करमुक्तपणे मिळते
PPF ही एक विश्वासार्ह आणि जोखीममुक्त दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. लहान गुंतवणूक सुरू करून भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येतो. विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्ती नियोजनासाठी, आणि करबचतीसाठी PPF सर्वोत्तम मानली जाते.