भारताची लोकसंख्या 1.46 अब्जच्या पुढे; 2026 पासून डिजिटल जनगणनेची तयारी सुरू

नवी दिल्ली, १८ जून २०२५ – संयुक्त राष्ट्रसंघ आणि विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्जच्या पुढे गेली असून, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून भारताने चीनला मागे टाकले आहे. मात्र, याचवेळी भारतातील प्रजनन दर (TFR) झपाट्याने घसरत असल्याने भविष्यकाळात आर्थिक आणि सामाजिक आव्हान निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

लोकसंख्या वाढ, पण बदलते जनसांख्यिकीय चित्र

भारताची सध्याची लोकसंख्या 1,463,370,895 इतकी असल्याचे “Statistics Times” ने नमूद केले असून, जुलै 2025 पर्यंत ही संख्या 1,463,865,525 होण्याची शक्यता आहे.तुलनेत चीनची लोकसंख्या सुमारे 1.41 अब्ज आहे.”World Population Review” आणि संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसारही भारताचे लोकसंख्यात्मक वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

प्रजनन दरात घट – धोरणात्मक संकेतभारताचा टोटल फर्टिलिटी रेट (TFR) 1.9 वर पोहोचला आहे, जो 2.1 या ‘replacement level’ पेक्षा खाली आहे.शहरी भागात हा दर अधिक कमी (1.6–1.7) असून, उच्चशिक्षित महिलांमध्ये विवाह व मातृत्व उशिरा येण्याकडे कल आहे.तज्ज्ञांचे मत आहे की, यामुळे भविष्यात कामकाजासाठी सक्षम वयातील लोकसंख्या घटेल, आणि वृद्धांच्या संख्येत वाढ होईल.

पुढील जनगणना – २०२६ पासून नवा अध्याय

केंद्र सरकारने 2026–27 साली भारताची पुढील जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जनगणना डिजिटल स्वरूपात होणार आहे.हिमालयी राज्यांमध्ये 1 ऑक्टोबर 2026, तर अन्य राज्यांमध्ये 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होईल.यंदाच्या जनगणनेत जातनिहाय माहिती (caste enumeration) देखील गोळा केली जाणार आहे, जी 1951 नंतर पहिल्यांदाच होणार आहे.

धोरणांवर परिणाम – जातनिहाय माहितीचा उपयोग आरक्षण, संसदीय जागा, शासकीय योजना व सामाजिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी होणार आहे.या माहितीसोबत कामगार योजना, शहरी नियोजन, आरोग्य आणि शिक्षण वितरणासाठीही आधार मिळणार आहे.

Leave a Comment