भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना – दुसरा दिवस

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना दमदार खेळ पाहायला मिळाला. भारताच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले तर इंग्लंडनेही मजबूत प्रत्युत्तर देत सामना रंगतदार केला.

ऋषभ पंतच शानदार शतक आणि अनोखी सेलिब्रेशन – भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करत 132* धावा केल्या. शतक साजरे करताना त्याने मैदानात कलाटी मारत उत्सव साजरा केला. पंत इंग्लंडमध्ये 3 शतके करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.शुभमन गिलचा ठसठशीत खेळ – शुभमन गिलने दुसऱ्या दिवशी 147 धावांची खेळी करत भारतीय डावाला भक्कम पाया दिला. त्याच्या सुसाट फलंदाजीमुळे भारताची धावसंख्या झपाट्याने वाढली

भारताची भक्कम धावसंख्या, इंग्लंडचे प्रत्युत्तर – भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने शतक (100*) ठोकत संघाला 209/3 अशी स्थिर स्थिती मिळवून दिली. इंग्लंड अजूनही 262 धावांनी पिछाडीवर आहे. बुमराहचा भेदक मारा – जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेत इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला हादरा दिला. त्याने झॅक क्रॉली, बेन डकेट आणि जो रूट यांना माघारी पाठवले.

भारताला तिसऱ्या दिवशी लवकर विकेट्स मिळवून इंग्लंडला कमी धावसंख्येत रोखावे लागेल.इंग्लंडकडून ओली पोपवर मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.सामना अजूनही दोन्ही संघांसाठी खुला आहे. पुढील दिवसात सामन्याचा कल बदलण्याची शक्यता आहे.

.

Leave a Comment